भारतातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना केले अभिवादन !

भारतातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना केले अभिवादन !


शुभांगी घरत यांची शिवरायांच्या मंदिरासाठी एक लाखाची देणगी.

उरण / विठ्ठल ममताबादे 

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नितांतसुंदर असे भारतातील पहिलेच गणले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे बांधले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील हे पहिले मंदिर (शक्तिपीठ) भव्यदिव्य आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने खुलून दिसतेय. शिवरायांची मूर्ती डोळ्यांचे पारणे भेडणारी आहे.



या मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. १७) झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शिवरायांना अभिवादन केले.

शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त डाॅ. राजूभाऊ चौधरी यांनी महेंद्रशेठ घरत आणि राजू कोळी यांचा शिवरायांच्या  मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार केला.


शुभांगी महेंद्र घरत यांनी मंदिरासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.

शिवरायांचे भव्य मंदिर आणि ऐतिहासिक मांडणी, कलाकुसर, तैलचित्रे पाहून महेंद्रशेठ घरत यांनी आनंद व्यक्त केला आणि मंदिराचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांचे अभिनंदन केले. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाप्रमुख दयानंद चोरघे, मनोज कोळी आदी उपस्थित होते.

---------