विविध योजनेत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई मधील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
८५,६०,००० रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल.
आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेशमा घरत, सुजाता घरत यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
कोणाचे आर्थिक फसवणूक झाल्यास उरण पोलीस स्टेशनला कळविण्याचे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन.
उरण / विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील धाकटी जुई येथील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत या महिलांनी विविध योजनेच्या माध्यमातून विविध आमिष, प्रलोभने दाखवून उरण तालुक्यातील पागोटे गावातील हर्षाली सुजित तांडेल यांची २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच इतर नागरिकांना देखील फसविले आहे.
असे एकूण ८५, ६०,०००(पंच्याऐंशी लाख, साठ हजार रुपये )रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे. घेतलेले पैसे परत देत नसल्याने व दमदाटी करत असल्याने हर्षाली सुजित तांडेल, सुजित तांडेल यांनी धाकटी जुई गावातील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर आर्थिक फसवणूकी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
उरण तालुक्यातील पागोटे, जेएनपीटी येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे सुजित हसुराम तांडेल यांचा कौशिक रोडवेज तसेच हिताली रोडवेज या नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यांची पत्नी हर्षाली सुजित तांडेल हिची वर्ग मैत्रीण रेशमा अमित घरत राहणार धाकटी जुई, उरण हिचे मागील तीन वर्षापासून हर्षाली तिच्या घरी येणे जाणे होते. त्या दरम्यान हर्षाली हिने आपले पती सुजित तांडेल यांना माझी मैत्रीण रेशमा घरत तिच्याकडे एक व्यवसायाची योजना आहे असे सांगितले.त्याप्रमाणे सुजित तांडेल यांनी रेश्मा घरत यांच्याकडून ती योजना समजून घेतली. तिच्याकडे असलेल्या या व्यवसायाच्या योजनेत जर वीस लाख रुपये गुंतवले तर त्या मोबदल्यात रेश्मा घरत ही दोन महिन्याला एक लाख रुपये परतावा देईल, तसेच एक वर्षानंतर मी गुंतवलेली मुद्दल वीस लाख रुपये व त्यावरील परतावा सात लाख असे एकूण सत्तावीस लाख रुपये देण्याचे आमिष दिले.
त्याप्रमाणे रेश्मा हिच्या म्हणण्यानुसार तसेच तिच्यावर विश्वास ठेवून सुजित तांडेल यांनी तिच्या घरी दिनांक ०६/१२/२०२३ ते दिनांक १५/१२/२०२३ रोजीच्या दरम्यान वेळोवेळी रोख रक्कम तसेच बँकेच्या ट्रान्सफर मार्फत एकूण वीस लाख रुपये दिले.
पागोटे गावचे सुजित तांडेल यांनी आपल्या बायकोच्या सांगण्या वरून बायकोची मैत्रीण धाकटी जुई मधील रेशमा घरत हिला विविध योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दिनांक ६/१२/२०२३ ते १५/१२/२०२३ या कालावधीत रोख व चेक स्वरूपात २० लाख रुपये दिले होते.
मात्र वारंवार दिलेले पैसे परत देण्याची विनंती करून सुद्धा सुजित तांडेल यांना आपले २० लाख रुपये मिळाले नाहीत.उलट धाकटी जुई गावचे रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांनी सुजित तांडेल यांना दमदाटी करत धमकी दिली."माझेकडे आत्ता पैसे नाहीत.तुम्ही माझ्याकडे वारंवार येऊ नका. नाहीतर मी तुमच्यावर महिलेला घरी येऊन त्रास देता अशी पोलीस ठाण्यात तक्रार देईन" अशी सदर महिलेने सुजित तांडेल व हर्षाली सुजित तांडेल यांना धमकी दिली.
पैसे देणार नाही. अशी धमकी दिल्याने माजी उपसरपंच सुजित तांडेल, हर्षाली तांडेल यांच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेने सुजित तांडेल व त्यांच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला असून सुजित तांडेल व त्यांच्या परिवाराला खूप मोठया आर्थिक, शारीरिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पागोटे गावचे हर्षाली सुजित तांडेल व सुजित तांडेल यांनी उरण पोलीस ठाण्यात जाऊन आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी धाकटी जुई गावातील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुजित तांडेल, हर्षाली तांडेल यांच्याजवळ असलेले महत्वाचे पुरावे व माहिती तसेच इतर तपास लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ४२०, ४०६, ५०६, ३४,महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षण )अधिनियम १९९९ कलम ३, कलम ४ अंतर्गत दिनांक १८/३/२०२५ रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुजित तांडेल, हर्षाली तांडेल यांनी रेशमा घरत यांना आपले दिलेले पैसे परत मागितले असता धाकटी जुई गावच्या रेशमा अमित घरत यांनी सदरचे पैसे सुजाता घरत यांच्याकडे गुंतविल्याचे सांगितले. तिच्याकडुन पैसे आल्यावरच तुमचे पैसे देतो असे वारंवार बोलू लागली. शेवटी सुजित तांडेल व त्यांच्या पत्नी हर्षाली सुजित तांडेल यांनी रेशमा घरत यांना घेऊन सुजाता घरत हिच्या घरी जाऊन गुंतविलेले रक्कम व परतावा मागितला असता सुजाता घरत व रेशमा घरत यांनी एक महिना वाढवून देण्याची मागणी केली. एक महिन्याची मुदत मागितली. त्यावेळी रेश्मा घरत हिने दिनांक २८/८/२०२४ रोजी १०० रुपयाच्या बॉण्ड पेपरवर २० लाख रुपये परत देणार असल्याचे लिहून दिले. तसेच सुजित तांडेल यांना त्यांच्या कडुन दोन कोरे चेक मिळाले. मात्र हे दोन चेक सुद्धा वटले नाहीत. अकॉउंट मध्ये पुरेसे रक्कम नसल्याने चेक वटले नाही.तसेच भुमिका परेश गावंड वय ३८ वर्षे, पत्ता मु. बोरखार, पो. दिघोडे, ता. उरण, जि. रायगड हीला रेशमा अमित घरत व सुजाता मनोज घरत या दोघींनी स्वस्तामध्ये उलवे नोड, नवी मुंबई येथे फ्लॅट घेउन देतो असे अमिष देवुन तिच्याकडुन दिनांक ७/८/२०२३ ते दिनांक ३१/८/२०२३ रोजी दरम्यान रोख व आरटीजीएस मार्फतीने एकूण ४०,००,०००/- (अक्षरी चाळीस लाख रुपये )रूपये रक्कम स्विकारून त्यामोबदल्यात तिला फ्लॅट दिला नाही तसेच तिची रक्कम देखील परत न करता आर्थिक फसवणुक करून सदर रक्कम परत मागितल्यास त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली असल्याचे बाब समोर आली आहे .तसेच परी नंदकिशोर घरत वय ३० वर्षे, व मालती घरत दोघीही राहणार हनुमान मंदीराजवळ धाकटी जुई, पो. दिघोडे, ता. उरण, जि. रायगड यांना सुजाता मनोज घरत हीने 'ती डंपर व जेसीबी व्यवसायासाठी घेणार असुन सदर व्यवसायासाठी तिच्याकडे रक्कम गुंतवली तर त्या मोबदल्यात तीन महीन्यात ५ टक्के परतावा व मुद्दल परत मिळेल' असे अमिष देउन त्यांचेकडुन एकूण २५,६०,०००/- रू. रोख रक्कम स्विकारून त्यामोबदल्यात त्यांना व्यवसायातील परतावा तसेच त्यांची मुद्दल देखील परत न देता फसवणुक केल्याचे देखील बाब समोर आली आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात येताच आर्थिक फसवणूक करणाऱ्या रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर सुजित तांडेल, हर्षाली तांडेल यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत तानाजी शेंडगे करीत आहेत.
जनतेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर आता कोणती कारवाई होते हे पाहणे आता महत्वाचे ठरेल. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.रेशमा घरत, सुजाता घरत यांनी कोणाचेही आर्थिक फसवणूक केल्यास उरण पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन उरण पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.
---------
---------