पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करणा-या सुरक्षा रक्षकांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून निषेध.

पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करणा-या सुरक्षा रक्षकांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून निषेध.



कुलाबा प्रभात वृत्तसेवा

मुंबईच्या विधानभवन परिसरात पत्रकारांना सुरक्षा रक्षकांकडून मंगळवार दि.18 मार्च राेजी धक्काबुक्की व अरेरावी केल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्ह्याच्यावतीने निषेध नाेंदवत जिल्हा पोलिस अधिक्षक,उपविभागिय पोलिस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पाेलिस निरिक्षक खालापूर सचिन पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.

लोकशाहिचा चौथा स्तंभ असणा-या पत्रकार बांधवांवर महाराष्ट्रात पत्रकारांच्या भावना दुखावल्या जातील अशा घटना घडत आहेत.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात काेणत्याही ठीकाणी पत्रकारांवर अनुचित प्रकार  घडल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे.

 रायगड जिल्ह्यातील पत्रकारावर अनुचीत प्रकार हाेऊ नये याकरिता जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांच्या सह जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांचे जिल्ह्यात विशेष कार्य सूरू आहे.

मुंबईच्या विधानभवन परिसरात वृत्तांकन करीत असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी केल्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निषेध नोंदवून संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, अर्जुन कदम,दिनकर भुजबल,प्रसाद अटक,अमाेल सांगळे यांन सह पदाधिकारी व सदस्यांनी निवेदन दिले असून पत्रकारांना धक्काबुक्की करणा-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 ---------