लोधिवली येथे अखंड हरिनाम उत्सव उत्साहात संपन्न.

 लोधिवली येथे अखंड हरिनाम उत्सव उत्साहात संपन्न.


लाेधिवली / एकनाथ सांगळे

मानवी जीवनात अगणित संपत्ती असून सुध्दा सुख शांती मिळत नाही जाती धर्मातील भेद मत्सर दूर करून प्रवचन किर्तनाद्वारे ज्ञानदान देऊन मानवाला मानव म्हणून जगण्याचे विचार मिळवून देण्याच्या  उद्देशाने आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय मंडळ लोधिवली गेले 28 वर्षे अखंड हरिनाम उत्सव हनुमान - विठ्ठल रखुमाई मंदिर लोधिवली येथे भक्ती भावाने साजरा हाेत आहे.

वैकुंठावरील परमदैवत श्री पांडूरंगाच्या कृपेने तसेच सु.नि.ह.भ.प.बाळाराम महाराज कांबेकर यांच्या आशिर्वादाने तसेच गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज राणे हालिवळी यांच्या कुशल मार्गदर्शनाद्वारे आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ लोधिवली यांनी श्री ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन,हरि कीर्तन आयोजित केले होते.

यावर्षीचे हे 28 वे वर्ष असून अखंड हरिनाम उत्सवाच्या प्रारंभी प्रथमतः कलश पूजन,श्रीची पूजा,ध्वजारोहण,विणा पूजन,ग्रंथ पूजन,तुळशी पूजन करण्यात आले.

अखंड हरिनाम उत्सव सोहळ्यात पहाटे काकड भजन व भुपाळ्या,सकाळी ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी प्रवचन,हरिपाठ,हरिकिर्तन तदनंतर हरिजागर भजन आयोजित केले होते.

प्रथम दिनी हभप बाळाराम महाराज कुरंगळे यांचे प्रवचन तर रात्री हभप सच्चिदानंद महाराज कांबेकर यांचे हरिकिर्तन संपन्न झाले.

द्वीतीय दिनी हभप दत्ता महाराज शिंदे यांचे प्रवचण तर रात्री हभप संदिप महाराज यादव यांचे हरिकिर्तन,

तर तृतीयदिनी सायंकाळी दिंडी सोहळा दिपोत्सव व रात्री हभप प्रविण महाराज फराड यांचे हरिकिर्तन संपन्न झाले.

यावेळी सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती आणि हभप संदिप महाराज यादव यांच्या हस्ते दीप प्रज्योलीत करण्यात आला.




यावेळी उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले.आणी दीपोत्सव प्रज्योलीत करून  ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गेले तिन दिवस अखंड  हरिनाम भजन,क़िर्तनाच्या माध्यमातून लोधिवली परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमला.


दीपोत्सव  दिवशी गावातून भव्य - दिव्य  पायी पाळखी दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.

काल्याके किर्तन दिलीप महाराज राणे हालिवळी यांच्या हरिकिर्तनाने  सप्ताहाची सांगता व महाप्रसाद हाेऊन करण्यात आली.

अखंड हरिनाम उत्सव नियोजनबद्द पार पाडण्यासाठी आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ लोधिवली यांनी विशेष मेहनत घेतली.

 ---------