पातळगंगा परिसरात बहरला पळस...पांगारा अन शाल्मली!
वै
रसायनी / राकेश खराडे
चैत्र,वैशाख महिने सुरू झाले की रानावनांत पळस..पांगारा...अन शाल्मली ही वृक्ष हजारो फुला-फुलांनी बहरून गेली असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.यामुळे ही वृक्ष प्रत्येकाला आपल्या अप्रतिम सौदर्यांने मंत्रमुग्ध करून टाकत आहे.ही बहरलेली वृक्ष रानावनात आणी रस्त्याच्या कडेला फुला-फलांनी बहरून गेलेली दिसत आहे.बहरलेली ही वृक्ष आपले लक्ष वेधून घेतली जात आहे.लाल,केशरी,नारंगी फुला-फलांनी बहरलेली...नटलेली ही वृक्ष बघताच अनेकांच्या मनात त्या फुलांविषयी कुतूहल निर्माण होते असते.
अगदी कडक ऊन्हातही नेत्रसुख देणा-या पळस,पांगारा व शाल्मली वृक्ष केशरी,नारंगी फुलांनी बहरलेल्या वृक्षांवर (रोझी पँस्टर),पळस मैना,हळदे,बुलबुल,तांबट,सुर्यपक्षी ,फुलटोच इत्यादी पक्षी भुंगे आणि मधमाशा या फुलातील मध पिण्यासाठी सकाळच्या प्रहारी मग्न झालेली पाहावयास मिळत आहे. अशा बहरलेल्या वृक्षांवर हे पक्षी अगदी हमखास पणे दिसून येतात.बहरलेली वृक्ष पक्षीमित्र व पक्षीप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच असते.
पळस आणि शाल्मली ही वृक्ष बहरण्यापूर्वी. पर्णहीन होवून जातात व संपूर्ण वृक्ष निष्पर्ण होवून मग ते केवळ फुला -फुलांनी बहरून जातात ,नटून जातात.पांगारा हा वृक्ष बहरताना तो फांदीच्या शेंड्याकडे लाल-लाल फुलांनी बहरून जातो.शाल्मली या वृक्षाला संपूर्ण काटे-काटे असतात त्यामुळे त्याला अनेक जण काटेसावर असे म्हणतात.तर इंग्रजी मध्ये त्याला "सिल्क काँटन ट्री"असे म्हटले जाते.शाल्मलीच्या पर्णहिन वृक्षाला मोठ्या आकाराची लाल लाल रंगाची हजारो फुले येवून तो पुर्णपणे बहरून जातो.त्यावेळी त्या बहरलेल्या वृक्षाचे रूप अतिशय सुंदर अन देखणे असे असते.पळस हा वृक्ष संपूर्ण केशरी नारंगी रंगाच्या फुला-फुलांनी बहरून जातो.
फाल्गून चैत्रात तर या बहरलेल्या वृक्षाचे रूप अतिशय मनमोहक असे असते.रानांत तर अशी बहललेली हजारो वृक्ष पाहतकाच क्षणी या ठिकाणी जणू धरती लाळ शालू परिधान केलेचा भास निर्माण होत आहे.तर पांगारा वृक्ष लालसर फुलांनी बहरल्यामुळे त्याला "कोरल ट्री"असे म्हणतात.दरम्यान पळस,पांगारा व शाल्मली अशी ही तिनही वृक्ष यावर्षी बहरलेली दिसून येत.मात्र जेथे पाणी आहे त्या भागातील वृक्ष जादा प्रमाणात बहरलेले दिसून येतात.हे वृक्ष पक्ष्यांसाठी पक्षीप्रेमी व पक्षी मित्रांसाठी एक पर्वणीच असते म्हणून या वृक्षांचे जतन ,संवर्धन व्हावे. अशी सर्वाकडून अपेक्षा पक्षीमित्र आणि पर्यप्रेमी करीत आहे.